पुढील आठवड्यापासून ट्रॅक्टर मार्च; संयुक्त किसान मोर्चाची घोषणा

संयुक्त किसान मोर्चाने २०२०-२१ त्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. चलो दिल्ली आंदोलनाचे ते भाग नसले तरी त्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे.
पुढील आठवड्यापासून ट्रॅक्टर मार्च; संयुक्त किसान मोर्चाची घोषणा

चंदिगड : हरयाणाचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करतानाच पुढील आठवड्यापासून ट्रॅक्टर मार्च सुरू करण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.

संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. मोर्चाने जाहीर केले की शेतकरी मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी देशभरात 'काळा दिवस' पाळतील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि राज्याचे गृहमंत्री अनिल विज यांचे पुतळे जाळतील. तसेच शेतकरी २६ फेब्रुवारी रोजी महामार्गावर ट्रॅक्टर मोर्चा काढतील आणि १४ मार्च रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर अखिल भारतीय अखिल किसान मजदूर महापंचायत आयोजित करतील, असेही संयुक्त किसान मोर्चाने घोषित केले आहे.

संयुक्त किसान मोर्चाने २०२०-२१ त्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. चलो दिल्ली आंदोलनाचे ते भाग नसले तरी त्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. दिल्ली चलो' हाकेचा एक भाग म्हणून हजारो शेतकरी तळ ठोकून असलेल्या शंभू आणि खनौरी सीमेवरील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी एसकेएमने गुरुवारी येथे बैठक घेतली. बलबीर सिंग राजेवाल म्हणाले की खट्टर आणि विज यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच दोघांनी राजीनामा द्यावा. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून न्यायालयीन चौकशी करावी आणि शेतकऱ्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही शेतकरी नेत्यांनी केली आहे.

भारती किसान युनियन (एकता उग्रहण) चे अध्यक्ष जोगिंदर सिंग उग्रान यांनी हरयाणा सरकारने शंभू आणि खनौरी सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांवरील दडपशाहीचा निषेध केला. आम्ही गृहमंत्री अमित शहा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि हरियाणाचे गृहमंत्री अनिल शाह यांच्या पुतळ्यांचे दहन करणार असल्याचेही उग्रहन म्हणाले.

शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, २६ फेब्रुवारी रोजी महामार्गांवर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येईल आणि जागतिक व्यापार संघटनेचा पुतळाही जाळण्यात येईल कारण कृषी क्षेत्र आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अधिपत्याखाली राहू नये, अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.

शेतकरी नेते दर्शन पाल म्हणाले की, मृत शेतकऱ्यावर १५-१६ लाख रुपयांचे कर्ज होते आणि ते माफ झालेच पाहिजे.

सहा सदस्यीय समितीची स्थापना

संयुक्त किसान मोर्चा (बिगर राजकीय) - या कारणासाठी एकजुटीने लढा देण्यासाठी मोर्चाने राजेवाल, उग्रहन, दर्शन पाल यांच्यासह एक सहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

शेतकरी नेते सर्वनसिंग पंधेर यांची मागणी

पंजाब-हरयाणाच्या खनौरी सीमेवर आंदोलक शेतकऱ्याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकरी नेते सर्वनसिंग पंधेर यांनी गुरुवारी केली. त्याचप्रमाणे पंजाब सरकारने राज्याच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर २५-३० ट्रॅक्टर-ट्रॉलींचे नुकसान केल्याप्रकरणी हरयाणा निमलष्करी दलाच्या जवानांवर कारवाई करावी, असेही पंधेर म्हणाले.

पंजाब-हरयाणा सीमेवरील खनौरी येथे बुधवारी झालेल्या चकमकीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आणि सुमारे १२ पोलीस कर्मचारी जखमी झाले.

काही आंदोलक शेतकरी बॅरिकेड्सकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली. भटिंडा जिल्ह्यातील सुभकरण सिंग (२१) यांचा संगरूर-जिंद सीमेवर खानौरी येथे मृत्यू झाला. पतियाळा येथे पत्रकारांशी बोलताना पंधेर यांनी हरियाणाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पंजाबच्या हद्दीत घुसून खनौरी बॉर्डर पॉइंटवर शेतकऱ्यांवर बळाचा वापर केल्याचा आरोप केला. पंजाब सरकारने कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवावा अशी आमची इच्छा आहे, असेही पंधेर म्हणाले.

शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी पंजाब सरकारने सुभकरणला शहीदाचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली. हरयाणा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पंजाबच्या हद्दीत २५-३० ट्रॅक्टर-ट्रॉलींचे कथित नुकसान केल्याची पंजाब सरकारने दखल घ्यावी, अशी मागणीही डल्लेवाल यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in