पुढील वर्षी व्यापाराची उलाढाल तब्बल १ टक्का मंदावणार;जागतिक व्यापार संघटनेचा अंदाज

आधीच्या ३ टक्क्यांच्या अंदाजाच्या तुलनेत यंदा ३.५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
पुढील वर्षी व्यापाराची उलाढाल तब्बल १ टक्का मंदावणार;जागतिक व्यापार संघटनेचा अंदाज
Published on

वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (डब्ल्यूटीओ) अर्थात जागतिक व्यापार संघटनेने पुढील वर्षी व्यापाराची उलाढाल तब्बल १ टक्का मंदावणार आहे. उर्जेच्या वाढत्या किंमती, वाढते व्याजदर, रशिया - युक्रेन युद्धामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी आणि कोविड १९ महामारीच्या धक्क्यातून सावरत असताना चीनच्या उत्पादनाबाबत अनिश्चितता आदी समस्या आणि आव्हानांच्या पार्श्वभूमीवर जागतिक व्यापार संघटनेने अंदाज व्यक्त केला आहे.

जीनिव्हास्थित या व्यापार संघटनेने बुधवारी म्हटले आहे की, यंदा देशांकडून एकमेकांना पाठविण्यात येणाऱ्या मालाची उलाढाल आधीच्या ३ टक्क्यांच्या अंदाजाच्या तुलनेत यंदा ३.५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, आधीच्या ३.५ टक्कयांच्या तुलनेत २०२३ मध्ये व्यापार उलाढालीत १ टक्का घट होण्याची अपेक्षा आहे. पुढील वर्षी व्यापारात घसरण होण्याचा धोका आहे, असे डब्ल्यूटीओाचे महासंचालक गोझी ओकोजो -इवेला यांनी संघटनेच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in