ग्राहकांना ३० दिवसांचे रिचार्ज प्लॅन मिळणार; TRAI ने घेतला निर्णय

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) जारी केलेल्या नवीन ग्राहक संरक्षण नियमांतर्गत प्रीपेड मोबाईल वापरकर्त्यांना ३० दिवसांचे रिचार्ज प्लॅन्स आणि फक्त व्हाईस-आणि-एसएमएस असणारे पर्याय मिळणार आहेत.
ग्राहकांना ३० दिवसांचे रिचार्ज प्लॅन मिळणार; TRAI ने घेतला निर्णय
ग्राहकांना ३० दिवसांचे रिचार्ज प्लॅन मिळणार; TRAI ने घेतला निर्णय 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) जारी केलेल्या नवीन ग्राहक संरक्षण नियमांतर्गत प्रीपेड मोबाईल वापरकर्त्यांना ३० दिवसांचे रिचार्ज प्लॅन्स आणि फक्त व्हाईस-आणि-एसएमएस असणारे पर्याय मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा देशातील कोट्यवधी ग्राहकांना मिळणार आहे.

राज्यसभा खासदार राघव चड्डा म्हणाले की, संसदेत आपण याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. अनेक मासिक प्लॅन्सची मुदत २८ दिवसांची असल्याने प्रीपेड वापरकर्त्यांना वर्षातून १३ वेळा रिचार्ज करावे लागत होते. तसेच मोबाईल डेटा न वापरणाऱ्या ग्राहकांसाठी फक्त कॉलिंग प्लॅन देण्याची मागणीही त्यांनी केली होती.

ट्रायने २२ सप्टेंबर रोजी ‘टेलिकॉम कन्झ्युमर प्रोटेक्शन (१३ वी दुरुस्ती) नियम, २०२६’ अधिसूचित केले. या दुरुस्तीमुळे ३० दिवस किंवा त्याहून कमी मुदतीचे पर्याय तसेच दरमहा एकाच तारखेला नूतनीकरण करता येणाऱ्या प्लॅनसह, फक्त व्हाईस-आणि-एसएमएस स्पेशल टॅरिफ व्हाउचरची उपलब्धता वाढणार आहे.

व्हाईस-आणि-एसएमएस व्हाउचर मिळणार

प्लॅन्सअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कमी कालावधीच्या मुदतीसाठी, दर कपातीसह संबंधित फक्त व्हाईस-आणि-एसएमएस व्हाउचर सादर करावे लागतील.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in