Train Cancelled : पश्चिम रेल्वे मार्गावर मुसळदार पाऊस ; रेल्वे सेवा विस्कळीत

मुंबई सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन ,ऑगस्ट क्रांती, तेजस राजधानी एक्स्प्रेस या गाड्या बंद झाल्या आहेत.
Train Cancelled : पश्चिम रेल्वे मार्गावर मुसळदार पाऊस ; रेल्वे सेवा विस्कळीत

राज्यात मुसळधार पावसाने परत एकदा हाहाकार केला आहे. पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील एक्सप्रेस वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागात तीव्र मुसळधार पाऊस चालू आहे. कोसळलेल्या या तीव्र पावसामुळे मुंबई सेंट्रलहून दिल्ली, गुजरात, राजस्थानसाठी धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे जे वेळापत्रक आहे. त्यावर मोठा परिणाम झाला आहे. या मुसळधार पावसामुळे एकूण 19 रेल्वेगाड्यांचा खोळंबा झाला आहे. या सगळ्यांमुळे प्रवाशांना फार त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन ,ऑगस्ट क्रांती, तेजस राजधानी एक्स्प्रेस या गाड्या बंद झाल्या आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. गोध्रामध्ये देखील पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. गोध्रा रेल्वे स्थानकावर रुळावर पाणी साचलं आहे आणि त्या पाण्याची पातळी सतत वाढताना दिसत आहे. यामुळे रेल्वे सेवेवर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. मुंबई ते दिल्ली दरम्यानच्या रेल्वे सेवेवर देखील परिणाम झाला आहे. या रेल्वे स्थानकावर रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवासी अडकून पडले आहेत. मुंबई आणि दिल्ली दरम्यानच्या ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे राजधानीसह पॅसेंजर गाड्यांचे देखील मार्ग वळवण्यात आला आहे. तर, काही लोकल मेमू गाड्या रद्द केल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावर पाणी वाहत असल्याने नियोजित मार्गांवरील रेल्वेगाड्या पश्चिम रेल्वेने भोपाळ-इटारसी-खंडवामार्गे वळविण्याचा निर्णय घेतला. काही रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत तर काही रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे गणेशोत्सवानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फार मनस्ताप सहन करावा लागला आहे.

logo
marathi.freepressjournal.in