उत्तराखंडच्या चमोलीत नमामि गंगे प्रोजेक्टवर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट ; 15 कामगारांचा मृत्यू, अनेकजण जखमी

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत
उत्तराखंडच्या चमोलीत नमामि गंगे प्रोजेक्टवर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट ; 15 कामगारांचा मृत्यू, अनेकजण जखमी
Published on

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात एक दुख:द घटना समोर आली आहे. अलकनंदा नदीच्या काठी असलेल्या एका ट्रान्सफॉर्मचा स्फोट झाल्याने नमामि गंगे सीवर ट्रीटमेंट प्लांट प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱ्या दोन डझनहून अधिक कर्मचाऱ्यांना विजचा धक्का लागल्याची घटना घडली आहे.

या घटनेत १५ कामगारांचा मृत्य झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

उत्तराखंडचे पोलिस महासंचालक अशोक कुमार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार या घटनेत मृतांमध्ये पिपलकोटीच्या चौकीच्या प्रभारीचा समावेश आहे. तर चमोलीचे पोलीस अधिक्षक परमेंद्र डोवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीच्या काठावर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in