ट्रेनच्या चाकांखाली लपून २५० किमी फरफटत प्रवास; रेल्वे अधिकाऱ्यांना बसला आश्चर्याचा धक्का; तरुणाला अटक

ट्रेनच्या चाकांखाली लपून २५० किमी फरफटत प्रवास; रेल्वे अधिकाऱ्यांना बसला आश्चर्याचा धक्का; तरुणाला अटक

इटारसी ते जबलपूरदरम्यान धावणाऱ्या दानापूर एक्स्प्रेस ट्रेनच्या चाकाखाली लपून एका तरुणाने तब्बल २५० किमीपेक्षा जास्त प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Published on

जबलपूर : इटारसी ते जबलपूरदरम्यान धावणाऱ्या दानापूर एक्स्प्रेस ट्रेनच्या चाकाखाली लपून एका तरुणाने तब्बल २५० किमीपेक्षा जास्त प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनाही याबाबत आश्चर्याचा धक्का बसला असून आरपीएफने या तरुणाला ताब्यात घेतले आहे.

रेल्वेच्या एस-४ कोचची तपासणी करताना, रेल्वे कर्मचाऱ्यांना चाकाखाली एक तरुण लपलेला दिसला. तपासणीदरम्यान त्यांना चाकाखाली काही हालचाल दिसली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी याची माहिती रेल्वे पोलीस दलाला दिली, तेव्हा तरुणाला ताब्यात घेण्यात आले. या तरुणाकडे रेल्वेने प्रवास करण्यासाठी पैसे नव्हते म्हणून त्याने इटारसी ते जबलपूर असा प्रवास चाकांमध्ये लपून केल्याचे सांगितले.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षेच्या उपाययोजना आणखी मजबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे पोलीस दल या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करून कारवाई करणार आहे, असे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी हर्षित श्रीवास्तव यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in