
पुढील सुनावणी होईपर्यंत आरे कॉलनीतील वृक्षतोडबंदी सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली आहे. प्रस्तावित सरन्यायाधीश उदय उमेश लळीत, न्या. एस. आर. भट व न्या. सुधांशू धुलिया यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी ३० ऑगस्ट रोजी करण्याचे ठरवले आहे.
आरे कॉलनीत कोणतेही झाड तोडणार नाही, असे प्रतिज्ञापत्र एमएमआरसीएलच्या वतीने न्यायालयात सादर केले. याचिकादारांतर्फे वरिष्ठ वकील अनिता शेणॉय यांनी जमीन समतल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.