तृणमूलला अजून एक धक्का; अर्जुन सिंह यांनी पक्ष सोडला; भाजपमध्ये प्रवेश करणार

तृणमूल काँग्रेसने अर्जुन सिंह यांना डावलून पार्थ भौमिक यांना लोकसभा निवडणुकीसाठी बराकपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
तृणमूलला अजून एक धक्का; अर्जुन सिंह यांनी पक्ष सोडला; भाजपमध्ये प्रवेश करणार

उत्तर २४ परगणा : पश्चिम बंगालमधील बराकपूर मतदारसंघाचे खासदार अर्जुन सिंह यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

भाजपमध्ये कधी प्रवेश करणार त्याचे तपशील मात्र त्यांनी सांगितले नाहीत. मात्र मी भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित आहे, मी हा प्रवेश येथे किंवा दिल्लीत कुठेही करू शकतो. पक्ष मला जे काम देईल ते मी करीन असे सांगत तृणमूल काँग्रेस सोडण्याचे कारण सांगताना आपल्यावर अन्याय झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता जनताच याचे उत्तर देईल, अशीही टिप्पणी त्यांनी या संबंधात केली.

तृणमूल काँग्रेसने अर्जुन सिंह यांना डावलून पार्थ भौमिक यांना लोकसभा निवडणुकीसाठी बराकपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

अर्जुन सिंह यांनी गुरुवारी भाजपमध्ये 'घर वापसी' या घोषणेचे समर्थन करत संदेशखळीचा कथित सूत्रधार शाहजहान शेख याच्याकडे स्थानिक तृणमूल आमदार पार्थ भौमिक यांच्या सक्रिय संरक्षणाखाली नैहाटीमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन आणि इतर मालमत्ता असल्याचा खळबळजनक दावा केला.

बराकपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या आणि उत्तर २४ परगणा जिल्हा निवास संदेशखळीचा भाग असलेल्या नैहाटी येथील विद्यमान आमदार असण्यासोबतच, भौमिक हे राज्याचे पाटबंधारे मंत्री देखील आहेत. दरम्यान, सिंह यांनी असा दावा केला की, तृणमूल काँग्रेसचा एक प्रमुख नेताही भाजपमध्ये प्रवेश करणार आहे मात्र त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. ते गुरुवारी संध्याकाळीच दिल्लीला जात आहेत आणि शुक्रवारी भाजपच्या केंद्रीय मुख्यालयात जातील व तेथे ते प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in