निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करणारे तृणमूलचे नेते ताब्यात

तृणमूलचे खासदार डेरेक ओ'ब्रायन, मोहम्मद नदीमुल हक, डोला सेन, साकेत गोखले आणि सागरिका घोष, आमदार विवेक गुप्ता, माजी खासदार अर्पिता घोष, शांतनु सेन आणि अबीर रंजन विश्वास व पक्षाच्या युवा सेनेच्या उपाध्यक्ष सुदीप राहा यांना ताब्यात घेतले.
निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करणारे तृणमूलचे नेते ताब्यात

नवी दिल्ली : येथे निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात तृणमूलचे दहा सदस्यीय प्रतिनिधी मंडळ धरणे आंदोलन करत होते. पोलिसांनी त्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

तृणमूलचे खासदार डेरेक ओ'ब्रायन, मोहम्मद नदीमुल हक, डोला सेन, साकेत गोखले आणि सागरिका घोष, आमदार विवेक गुप्ता, माजी खासदार अर्पिता घोष, शांतनु सेन आणि अबीर रंजन विश्वास व पक्षाच्या युवा सेनेच्या उपाध्यक्ष सुदीप राहा यांना ताब्यात घेतले.

तृणमूलच्या नेत्यांनी ईडी, सीबीआय व एनआयएच्या प्रमुखांना बदलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. भाजप नेतृत्वाच्या इशाऱ्यावर केंद्रीय तपास यंत्रणा विरोधी पक्षांना लक्ष्य करत आहेत, असा आरोप तृणमूल सातत्याने करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in