ममतांविरुद्ध नाराजी व्यक्त करीत तृणमूलच्या खासदाराचा राजीनामा

ममता बॅनर्जी यांनी ज्या प्रकारे हाताळले, त्या कार्यशैलीवर नाराजी प्रकट करीत तृणमूल खासदार जवाहर सरकार यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
ममतांविरुद्ध नाराजी व्यक्त करीत तृणमूलच्या खासदाराचा राजीनामा
PTI
Published on

कोलकाता : कोलकाता येथील आर. जी. कर मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार-हत्या प्रकरण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ज्या प्रकारे हाताळले, त्या कार्यशैलीवर नाराजी प्रकट करीत तृणमूल खासदार जवाहर सरकार यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपण यापुढे राजकारणातूनही निवृत्ती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जवाहर सरकार यांनी रविवारी पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून सरकारच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, आर. जी. कर हॉस्पिटलमध्ये घडलेल्या भीषण घटनेनंतर महिनाभर मी गप्प बसलो. आंदोलक ज्युनिअर डॉक्टरांच्या बाबतीत तुम्ही तुमच्या जुन्या शैलीत हस्तक्षेप कराल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. आता सरकारने जी कारवाई केली आहे, ती फारच तोकडी आणि खूप उशिराने केली जात आहे. दोषींना घटनेनंतर लगेचच शिक्षा झाली असती, तर राज्यातील स्थिती फार पूर्वीच पूर्ववत झाली असती.

logo
marathi.freepressjournal.in