तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ ईडीच्या रडारवर ; फ्लॅट विक्रीत कोट्यावधींचा घोटाळ्याचा आरोप

नुसार यांनी फ्लॅट देण्याच्या नावाखाली ५०० जणांकडून पैसे घेतले, मात्र बराज वेळ होऊनही फ्लॅट दिला नसल्याचा आरोप नुरसत यांच्यावर केला गेला आहे.
तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ ईडीच्या रडारवर ; फ्लॅट विक्रीत कोट्यावधींचा घोटाळ्याचा आरोप

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत चहाँ या आज (१२ सप्टेंबर) ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. सकाळी दहा व वाजेच्या सुमारास सॉल्ट लेकमधील सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये नुसरत जहाँ या चौकशीसाठी पोहचल्या असून फ्लॅट घेण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नुसरत यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी गेल्या आठवड्यात नुसरत यांना ईडीने नोटीस बजावली आणि पुढील आठवड्यात १२ सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्या आज ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.

नुसार यांनी फ्लॅट देण्याच्या नावाखाली ५०० जणांकडून पैसे घेतले, मात्र बराज वेळ होऊनही फ्लॅट दिला नसल्याचा आरोप नुरसत यांच्यावर केला गेला आहे. सेव्हन सेन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने गुंतवणुकदारांना, जेष्ट नागरिकांना चार वर्षात वाजवी किंमतीत फ्लॅट देण्याची हमी दिली होती. यानुसार त्यांनी कोट्यावधी रुपये गोळा केले होते. मात्र, या लोकांना अद्याप फ्लॅट देण्यात आलेले नाहीत. या कंपनीवर फ्लॅट विक्रीत वीस कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. नुसरत जहाँ या कंपनीवर संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे त्यांच्यावर जेष्ठांची फसवणूक केल्याचा आरोप होता.

भाजप नेते शंकुदेव पांडा याप्रकरणी अनेक तक्रारदारांसह गरियाहाट पोलीस स्टेशन आणि सॉल्ट लेक सीजीओ कॉम्प्लेक्स येतील ईडी कार्यालयात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. यावेली फसवणूकच्या आरोपाखाली गरियाहाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीच्या आधारे कोलकाता पोलीस आणि ईडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

याच बरोबर कॉर्पोरेट कंपी सेव्ह सेन्स इन्फास्ट्रक्चर लिमिटेडचे आणखी एक संजालक राकेश सिंह यांनाही चौकशी हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत. या दोघांना कोलकाता येथील साल्ट लेक येथील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, या फसवणूक प्रकरणात बसीरहाटमधील तृणमूल खासदार नुसरत जहाँ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून तापासात सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in