तृणमूलच्या जाहीरनाम्यात सीएए रद्द करण्याचे आश्वासन

केंद्रात इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास सीएए रद्द करण्याबरोबरच अनेक कल्याणकारी योजना राबविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तृणमूलचे राज्यसभेतील नेते डेरेक ओब्रायन यांनी जाहीरनामा घोषित केला.
तृणमूलच्या जाहीरनाम्यात सीएए रद्द करण्याचे आश्वासन
Published on

कोलकाता : पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल काँग्रेसने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा घोषित केला. केंद्रात इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास सीएए रद्द करण्याबरोबरच अनेक कल्याणकारी योजना राबविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तृणमूलचे राज्यसभेतील नेते डेरेक ओब्रायन यांनी जाहीरनामा घोषित केला.

केंद्रात इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास दरस्थिरता निधी स्थापन करून पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवण्याचे, नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याचे आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) रद्द करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे घरपोच रेशन आणि द्रारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वयंपाकाचे १० सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीत आहे.

logo
marathi.freepressjournal.in