ट्रक-ऑटोरिक्षाची भीषण टक्कर; १२ ठार, गंगास्नानासाठी जाताना अपघात

धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रस्त्याच्या कडेला चुकीच्या बाजूने जाणाऱ्या कंटेनरशी रिक्षीची ही टक्कर झाली
ट्रक-ऑटोरिक्षाची भीषण टक्कर; १२ ठार, 
गंगास्नानासाठी जाताना अपघात

शहाजहानपूर (उत्तर प्रदेश) : पौर्णिमेनिमित्त गंगा नदीत स्नान करण्यासाठी फारुखाबादला जाणाऱ्या प्रवाशांच्या ऑटोरिक्षाची व कंटेनर ट्रकची अबरेली-फारुखाबाद रस्त्यावर समोरासमोर भीषण टक्कर झाल्याने तीन महिलांसह १२ जण ठार झाले. गुरुवारी सकाळी ही भीषण दुर्घटना घडली. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रस्त्याच्या कडेला चुकीच्या बाजूने जाणाऱ्या कंटेनरशी रिक्षीची ही टक्कर झाली, असे पोलीस अधीक्षक (एसपी) अशोक कुमार मीना यांनी सांगितले.

ऑटोरिक्षातील प्रवासी 'पौर्णिमे'निमित्त गंगा नदीत स्नान करण्यासाठी फारुखाबादला जात होते. शहरापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या अल्लागंज पोलीस ठाणे क्षेत्रातील सुगसुगी गावाजवळ बरेली-फारुखाबाद रस्त्यावर हा दुर्दैवी अपघात झाला, असे पोलीस अधीक्षक (एसपी) अशोक कुमार मीना यांनी सांगितले.

या अपघातात लालाराम (३०) आणि त्याचा भाऊ पुट्टू लाल (५०), शिवपाल (४५), सुरेंद्र कश्यप (५०), अंकुश (५०), अनंत राम (३५) आणि त्यांची पत्नी बसंता देवी (७०) अशी मृतांची नावे असल्याचे मीना यांनी सांगितले. मणिराम (४५), पोथीराम (५०), रंपा देवी (४५), रूपा देवी (५०) आणि आदेश (२०) हे मरण पावले. अपघातानंतर कंटेनर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला व त्याने त्यानंतर अपघातस्थळापासून १२ किलोमीटर अंतरावर त्याचे वाहन सोडून दिलेले आढळून आले.

logo
marathi.freepressjournal.in