TVS मधील वारसा हक्काचा वाद चिघळला; लक्ष्मी वेणू यांची कौटुंबिक मालमत्ता वाटणीसाठी न्यायालयात धाव

टीव्हीएस मोटर कंपनीचे मानद अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांच्या कन्या लक्ष्मी वेणू यांनी टीव्हीएस कुटुंबाच्या ‘वेणू श्रीनिवासन शाखेच्या’ संयुक्त कौटुंबिक मालमत्तेच्या वाटणीसाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
TVS मधील वारसा हक्काचा वाद चिघळला; लक्ष्मी वेणू यांची कौटुंबिक मालमत्ता वाटणीसाठी न्यायालयात धाव
TVS मधील वारसा हक्काचा वाद चिघळला; लक्ष्मी वेणू यांची कौटुंबिक मालमत्ता वाटणीसाठी न्यायालयात धाव
Published on: 

नवी दिल्ली : टीव्हीएस मोटर कंपनीचे मानद अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांच्या कन्या लक्ष्मी वेणू यांनी टीव्हीएस कुटुंबाच्या ‘वेणू श्रीनिवासन शाखेच्या’ संयुक्त कौटुंबिक मालमत्तेच्या वाटणीसाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात लक्ष्मी यांनी कौटुंबिक मालमत्तेची रीतसर वाटणी करून आपल्या कायदेशीर हक्काचा वाटा देण्याची मागणी केली आहे.

संवादाच्या माध्यमातून सामंजस्याने प्रश्न सोडवण्याचे वारंवार केलेले प्रयत्न अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)