त्विषा शर्मा हत्या प्रकरणी गिरीबाला सिंग अटकेत

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने त्विषा शर्मा यांच्या हत्ये प्रकरणी सासू व माजी न्यायाधीश गिरीबाला सिंग यांना अटक झाली आहे. त्यापूर्वी त्यांचा अटकपूर्व जामीन उच्च नायायालयाने रद्द केला. गिरीबाला सिंग यांच्यावर हुंडाबळीसाठी सुनेचा छळ केल्याचा आरोप आहे.
त्विषा हत्या प्रकरणी गिरीबाला सिंग अटकेत
त्विषा हत्या प्रकरणी गिरीबाला सिंग अटकेत
Published on

नोएडा (उत्तर प्रदेश) : मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने त्विषा शर्मा यांच्या हत्ये प्रकरणी सासू व माजी न्यायाधीश गिरीबाला सिंग यांना अटक झाली आहे. त्यापूर्वी त्यांचा अटकपूर्व जामीन उच्च नायायालयाने रद्द केला. गिरीबाला सिंग यांच्यावर हुंडाबळीसाठी सुनेचा छळ केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या शरीरावर असलेल्या अनेक जखमा आणि मानसिक छळाचे पुरावे यांसारख्या गोष्टींची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

नोएडाची रहिवासी असलेली त्विषा शर्मा हिचा विवाह डिसेंबर २०२५ मध्ये भोपाळचे रहिवासी समर्थ सिंग यांच्याशी झाला होता. १२ मे रोजी तिचा मृत्यू झाल्यानंतरतिच्या कुटुंबियांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता.

गिरीबाला सिंग आणि त्यांचा वकील मुलगा समर्थ या दोघांवरही हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली आरोप आहेत.

logo
marathi.freepressjournal.in