उदयपूर हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक,शहरात १४४ कलम लागू

टेलर कन्हैयालाल साहू यांची मंगळवारी दुपारी दुकानात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली.
उदयपूर हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक,शहरात १४४ कलम लागू

तालिबानी पद्धतीने केलेल्या हत्येनंतर उदयपूरमध्ये विविध ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ७ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण राजस्थानमध्ये २४ तास इंटरनेट बंद असून एका महिन्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. प्रशासनाने गर्दी जमवण्यास बंदी घातली असून याच दरम्यान भाजपने ‘उदयपूर बंद’ पुकारला आहे. दरम्यान, हत्येच्या २४ तासांनंतर गौस मोहम्मद आणि रियाझ जब्बार या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ‘एनआयए’ या दोघांची चौकशी करणार आहे.

टेलर कन्हैयालाल साहू यांची मंगळवारी दुपारी दुकानात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओही बनवला आणि पंतप्रधान मोदींना मारण्याचीही धमकी दिली. हत्येनंतर कुटुंबीयांनी काही मागण्या केल्या होत्या. त्यावर सहमती झाल्यानंतर कन्हैयालाल यांचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नातेवाईकांना ३१ लाख रुपये आणि दोन्ही मुलांना नोकरीचे आश्वासन देण्यात आले आहे. निष्काळजीपणा केल्यामुळे धनमंडी पोलीस ठाण्याचे एएसआय भंवरलाल यांना निलंबित करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in