सोशल मीडियावर भडकावू पोस्टप्रकरणी जम्मूमध्ये दोघांना अटक; ६ जणांवर गुन्हा दाखल

बजलता येथील अमित शर्मा यांनी जम्मू जिल्ह्यातील खाना चारगल या गावातील रहिवाशांच्या वतीने तक्रार दाखल केली
सोशल मीडियावर भडकावू पोस्टप्रकरणी जम्मूमध्ये दोघांना अटक; ६ जणांवर गुन्हा दाखल

जम्मू : दोन समुदायांमध्ये जातीय तणाव निर्माण करण्याच्या हेतूने सोशल मीडियावर आक्षेपार्ह सामग्री अपलोड केल्याबद्दल पोलिसांनी बुधवारी रात्री दोघांना अटक केली आणि इतर सहा जणांवर गुन्हा दाखल केला.

बजलता येथील अमित शर्मा यांनी जम्मू जिल्ह्यातील खाना चारगल या गावातील रहिवाशांच्या वतीने तक्रार दाखल केली की, बजलता येथील जफर हुसेन आणि नुसरत या दोन व्यक्तींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह मजकूर अपलोड केला आहे, ज्यामुळे दोन समुदायांमध्ये जातीय तेढ निर्माण होऊ शकते, अशी माहिती पोलीस प्रवक्त्याने दिली. नगरोटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in