Tamilnadu Bus Accident: तामिळनाडूत दोन बसची धडक; ६ जणांचा मृत्यू

एक खासगी बस मदुराईहून सेनकोट्टाईच्या दिशेने जात होती. त्याच सुमारास दुसरी बस टेनकासीहून कोविलपट्टीला निघाली होती. या दोन बसची समोरासमोर धडक झाली.
Tamilnadu Bus Accident: तामिळनाडूत दोन बसची धडक; ६ जणांचा मृत्यू
Published on

चेन्नई : तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यात दोन बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक खासगी बस मदुराईहून सेनकोट्टाईच्या दिशेने जात होती. त्याच सुमारास दुसरी बस टेनकासीहून कोविलपट्टीला निघाली होती. या दोन बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही बसचे अतोनात नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अधिकारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी अपघातस्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले.

पोलिसांनी अपघाताचा तपास सुरु केला असून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. जखमींना तातडीने उपचार देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अपघात स्थळाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात पोलिसांचे पथक बुलडोझरच्या मदतीने बचावकार्य राबवत असताना दिसत आहे. अपघातात दोन्ही बसचे नुकसान झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in