छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात दोन ‘कोब्रा’ जवान शहीद

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी स्फोटकांच्या सहाय्याने सुरक्षा दलांचा एक ट्रक उडविला. त्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ‘कोब्रा’ डिव्हिजनचे दोन जवान शहीद झाले.
छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात दोन ‘कोब्रा’ जवान शहीद

सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी स्फोटकांच्या सहाय्याने सुरक्षा दलांचा एक ट्रक उडविला. त्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ‘कोब्रा’ डिव्हिजनचे दोन जवान शहीद झाले.

सिलगेर आणि टेकलगुडेम यादरम्यान सुरक्षा दलांच्या छावण्या उभारण्यात आल्या होत्या. तिम्मापूरम गावानजीक नक्षलवाद्यांनी दुपारी हा स्फोट घडविला. कोब्राच्या २०१ युनिटने सिलगेर छावणीपासून गस्तीला सुरुवात केली होती. सुरक्षा जवान ट्रक आणि दुचाकीवरून जात होते. यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडीच्या सहाय्याने ट्रकला लक्ष्य केले. या स्फोटात कॉन्स्टेबल शैलेंद्र (२९) आणि वाहनचालक विष्णू आर. (३५) हे जवान शहीद झाले. स्फोट घडविण्यात आल्याची माहिती मिळताच तेथे सुरक्षा दलांच्या अधिक कुमक पाठविण्यात आल्या आणि जंगलातून मृत जवानांचे पार्थिव बाहेर काढण्यात आले. या परिसरात अद्यापही शोधमोहीम सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in