दोन दिवसांनंतर जस्टीन ट्रुडो कॅनडास रवाना

विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने दोन दिवस भारतात अडकून पडले
दोन दिवसांनंतर जस्टीन ट्रुडो कॅनडास रवाना

नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेसाठी भारतात आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो त्यांच्या खासगी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने दोन दिवस भारतात अडकून पडले होते.

रविवारी कॅनडाचे पंतप्रधान निघणार होते, मात्र त्याचवेळी त्यांच्या ए ३१० विमानात बिघाड झाला. यामुळे ट्रुडो यांना आपला भारतातील मुक्काम दोन दिवसांनी वाढवावा लागला. बिघडलेल्या विमानाच्या जागी दुसरे विमान थेट कॅनडातून मागवण्यात आले होते. ते रॉयल कॅनेडियन एअर फोर्सचे सीसी-१५० पोलारीस विमान सोमवारी रात्री नवी दिल्लीत दाखल होणार होते, पण त्याला अन्यत्र वळवावे लागले. कॅनेडियन पंतप्रधानांचे विमान बिघडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ऑक्टोबर २०१६ मध्ये बेल्जिअमला जाताना देखील हे विमान बिघडले होते.

logo
marathi.freepressjournal.in