Video : धक्कादायक! थंडीत शेकोटीसाठी नशेबाजांनी थेट बाईकच पेटवली, व्हिडिओ व्हायरल

कडाक्याच्या थंडीत शेकोटीसाठी दोन जणांनी थेट दुचाकी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना...
दिल्लीत अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांनी दुचाकी जाळली
दिल्लीत अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांनी दुचाकी जाळलीX
Published on

नवी दिल्ली, 25 जानेवारी : कडाक्याच्या थंडीत शेकोटीसाठी दोन जणांनी थेट दुचाकी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. या दोघांनीही अंमली पदार्थांचे सेवन केले होते असे सांगितले जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली ही घटना पुल-प्रल्हादपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी, २५ जानेवारी रोजी पहाटे घडली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पहाटे साडेतीनच्या सुमारास कथितपणे अंमली पदार्थांचे व्यसन केलेल्या दोघांनी एका घरासमोर उभ्या असलेल्या मोटारसायकलला आग लावली. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दोन्ही आरोपी जळत्या दुचाकीजवळ उभे राहून स्वत:ला उबदार ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या घटनेत मोटारसायकल पूर्णपणे जळून खाक झाली.

या घटनेसंदर्भात दिल्ली पोलिसांकडे तक्रार आली आहे की नाही आणि एफआयआर दाखल करण्यात आला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींची ओळखही अद्याप समजू शकलेली नाही. याबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

दिल्लीत थंडीचा कडाका कायम राहणार

पुढील दोन दिवस दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम राहील आणि त्यानंतर तीव्रता कमी होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) गुरुवारी (२५ जानेवारी) वर्तविला. उत्तराखंड, पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या बहुतांश भागांत किमान तापमान ३ ते ६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

logo
marathi.freepressjournal.in