तामिळनाडूत दोन फटाका कारखान्यांना आग ; १३ जणांचा मृत्यू, दोन जखमी

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ३ लाख रुपयांची, तर गंभीर जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली.
तामिळनाडूत दोन फटाका कारखान्यांना आग ; १३ जणांचा मृत्यू, दोन जखमी
Published on

विरुधनगर : विरुधनगर जिल्ह्यात रंगापलायन व किचनयाकानपट्टी या गावांत दोन फटाका कारखान्यांना आग लागली. या आगीत १३ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

ही आग विझवायला पोलीस, अग्निशमन दल व बचाव पथकाने तात्काळ सुरुवात केली. रंगापलायन येथील कारखान्यात सात जळालेले मृतदेह सापडले. त्यांची ओळख अजूनही पटू शकली नाही, तर या आगीतून तीन जणांची सुटका करण्यात आली.

किचनयाकानपट्टी येथे लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला, तर दोन महिलांना वाचवण्यात यश आले. त्यांना श्रीवुल्लूपत्तूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ३ लाख रुपयांची, तर गंभीर जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली.

logo
marathi.freepressjournal.in