सुखबीर संधू, ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त; अधीर रंजन चौधरी सरकारवर नाराज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज समितीची बैठक पार पडली. या समितीत पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी उपस्थितीत होते.
सुखबीर संधू, ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त; अधीर रंजन चौधरी सरकारवर नाराज

नवी दिल्ली : केरळचे ज्ञानेश कुमार आणि पंजाबचे सुखबीर सिंग संधू या दोन आयएएस अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज (१४ मार्च) समितीची बैठक पार पडली. या समितीत पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी उपस्थितीत होते. निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नियुक्तीवरून चौधरी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

अधीर रंजन चौधीर म्हणाले, मी बैठकीत सामील होण्यापूर्वीच निवडलेल्या उमेदवारांची यादी मागविली होती. परंतु, मला २१२ जणांच्या नावांची यादी दिली गेली. मला एका रात्रीत २१२ लोकांबद्दल माहिती कशी मिळू शकते. या समितीत पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री आणि मी आहे. या बैठकीत देखील सरकारकडे बहुमत आहे. त्यामुळे सरकारला जे वाटेल तेच होणार होते. त्यानुसार, सरकारच्या मर्जीप्रमाणे निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची निवड झाली आहे. यात केरळेचे ज्ञानेश कुमार आणि पंजाबचे सुखबीर संधू यांची आयुक्तपदी निवड झाली.

कोण आहे ज्ञानेश कुमार ?

१९९८ च्या बॅचचे ज्ञानेश कुमार हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. कुमार यांनी संसदीय कामकाज मंत्रालयात सचिव म्हणून काम केले. कुमार यांना मे २०२२ मध्ये सहकार मंत्रालयात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होते. या नियुक्तीनंतर ते संसदीय कामकाज मंत्रालयाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला. जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करताना ते गृह मंत्रालयात सहसचिव होते. याशिवाय, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या स्थापनेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ३१ जानेवारी २०२४ कुमार हे सेवानिवृत्त झाले.

कोण आहेत सुखबीर संधू ?

सुखबीर संधू हे १९८८ च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. संधू यांनी अमृतसरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी मिळवली. संधू यांनी गुरू नानक देव विद्यापीठातून इतिहासात पदव्युत्तर आणि कायद्याची पदवीही घेतली आहे. २०२१ मध्ये उत्तराखंडच्या मुख्य सचिव म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. याआधी त्यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे अध्यक्ष म्हणून काम केले. लुधियाना महानगरपालिकेच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात संधू यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in