एकाच दिवशी इंडिगोच्या दोन विमानांत बिघाड

इंडिगो कंपनीची सुमारे ४० विमाने अनेक महिन्यांपासून इंजिनमधील बिघाडामुळे बंद आहेत.
एकाच दिवशी इंडिगोच्या दोन विमानांत बिघाड
Published on

नवी दिल्ली : इंडिगो विमान वाहतूक कंपनीच्या दोन विमानांमध्ये मंगळवारी बिघाड झाला. दोन्ही विमानांमधील प्रॅट इंजिन बंद पडल्याने त्यांना सुरक्षितपणे जमिनीवर उतरवण्यात आले. पैकी एक विमान उद्देशित मुक्कामी सुखरूप उतरवण्यात आले, तर दुसरे मात्र उड्डाण केलेल्या ठिकाणीच माघारी बोलावण्यात आले. नागरी उड्डाण महासंचालकांनी या दोन्ही विमानांचे तांत्रिक मूल्यांकन करण्याचे काम सुरू केल्याची माहिती दिली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, इंडिगो एअरलार्इन्सचे विमान एअरबस ए३२१न्यूओ व्हीटी आययूएफ कोलकात्याहून बंगळुरूला जायला निघाले होते, मात्र उड्डाण केल्यानंतर या विमानाच्या दोन इंजिनपैकी एक इंजिन बंद पडले. त्यानंतर एका इंजिनावर हे विमान पुन्हा कोलकाता विमानतळावर माघारी बोलावण्यात आले. विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरले. तसेच दुसरे विमान मदुरार्इ ते मुंबर्इ मार्गावरील ६र्इ-२०१२ क्रमांकाचे होते. त्याचे एक इंजिन बंद पडले. मात्र ते आपल्या इच्छित मुक्कामी सुखरूपपणे उतरवण्यात आले. दोन्ही विमाने आता जमिनीवर असून त्यांची तांत्रिक तपासणी सुरू आहे. इंडिगो कंपनीची सुमारे ४० विमाने अनेक महिन्यांपासून इंजिनमधील बिघाडामुळे बंद आहेत.

logo
marathi.freepressjournal.in