जम्मू-काश्मीरमध्ये दोन घुसखोरांना कंठस्नान

घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला आहे
जम्मू-काश्मीरमध्ये दोन घुसखोरांना कंठस्नान

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईत कंठस्नान घालण्यात आले.

भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोमवारी ऑपरेशन बहादूर नावाने घुसखोरांना रोखण्यासाठी संयुक्त मोहीम हाती घेतली होती. त्या दरम्यान पूंछ जिल्ह्यातील चख्खन-दा-बाग या भागात नियंत्रण रेषेजवळ दोन घुसखोर भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न करताना आढळले. सुरक्षादलांनी केलेल्या गोळीबारात दोघेही मारले गेले. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला आहे. या परिसरात अद्याप शोधमोहीम सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in