अब्जावधी डॉलर्सचे दोन सेमीकंडक्टर प्रकल्प येणार

टॉवर सेमीकंडक्टर्सने सादर केलेल्या ८ अब्ज अमेरिकन डॉलर्स गुंतवणुकीच्या प्रस्तावावर आणि भारताच्या सेमीकंडक्टर रोडमॅपची स्थिती यावरील प्रश्नाला ते उत्तर देत होते.
अब्जावधी डॉलर्सचे दोन सेमीकंडक्टर प्रकल्प येणार

नवी दिल्ली : भारतात लवकरच अब्जावधी डॉलर्स गुंतवणुकीचे दोन सेमीकंडक्टर प्रकल्प येणार आहेत. याशिवाय, अनेक चिप असेंब्ली आणि पॅकेजिंग युनिट्सही भारतात येणार असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले.

मंत्री चंद्रशेखर यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत भारतात दोन सेमीकंडक्टर प्रकल्प भारतात येणार असल्याची पुष्टी केली. या दोन प्रकल्पांमधील एक इस्रायल-आधारित टॉवर सेमीकंडक्टर्सचा आणि दुसरा टाटा समूहाने सादर केलेला ८ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा प्रस्ताव आहे. हे तुमच्यासोबत शेअर करताना मला आनंद होत आहे. नजीकच्या काळात - ६५, ४० आणि २८ नॅनोमीटर तंत्रज्ञानामध्ये डॉलर फॅब्स आणि आम्ही मूल्यमापन करत असलेल्या इतर पॅकेजिंग प्रस्ताव असणार आहे, असे चंद्रशेखर म्हणाले.

टॉवर सेमीकंडक्टर्सने सादर केलेल्या ८ अब्ज अमेरिकन डॉलर्स गुंतवणुकीच्या प्रस्तावावर आणि भारताच्या सेमीकंडक्टर रोडमॅपची स्थिती यावरील प्रश्नाला ते उत्तर देत होते. आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या प्रकल्पाला मंजुरी न मिळाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात या प्रकल्पाला मंजुरी दिली जाईल, असे मंत्री म्हणाले.

सरकारला सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्सच्या स्थापनेसाठी चार आणि चिप असेंब्ली, टेस्टिंग, मॉनिटरिंग आणि पॅकेजिंग (एटीएमपी) युनिट्ससाठी १३ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. हे प्रस्ताव गुजरातमध्ये यूएस-आधारित मेमरी चिप निर्माता मायक्रोनद्वारे २२,५१६ कोटी रुपयांच्या चिप असेंबली प्लांटच्या व्यतिरिक्त आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in