वर्धमान : प. बंगालच्या वर्धमान रेल्वे स्थानकात पाण्याची टाकी फलाटावर पडली. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.
या दुर्घटनेनंतर रेल्वे अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याच्या टाकी खाली दबलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन सर्वांची सुटका केली. सर्व जखमींना रुग्णालयात पाठवले आहे.
रेल्वेने सांगितले की, पाण्याची टाकी फलाट क्रमांक २ व ३ वर पडली. या टाकीचा काही भाग रेल्वे मार्गावर पडला. त्यामुळे रेल्वेमार्गातील दगड उडून प्रवाशांना लागले. त्यात काही जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर रेल्वेने तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.