निपाह’चे केरळात दोन बळी

इतर चौघांची चाचणी करण्यात आली
निपाह’चे केरळात दोन बळी

कोझिकोडे : जिल्ह्यात निपाह या विषाणूने दोन जणांचा बळी गेला असून दोघेजण पॉझिटिव्ह सापडले आहेत, अशी माहिती राज्य सरकारने दिली. या घटनेमुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

कोझिकोडे जिल्ह्यात निपाह विषाणूने दोघांचा बळी गेला आहे. इतर चौघांची चाचणी करण्यात आली. त्यातील दोघे पॉझिटिव्ह, तर दोघेजण निगेटिव्ह आढळून आले. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत हा निपाह विषाणू असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. त्याऐवजी आरोग्य विभाग व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री विजयन यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in