दोन वर्षांच्या कार्टर डलासचा विक्रम; एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचणारा सर्वात लहान मुलगा

कार्टर डलास, वय वर्षे २. या चिमुरड्याने माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पाऊल ठेवून जागतिक विक्रम केला आहे. यापूर्वी माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पाऊल ठेवणारा मुलगा चार वर्षांचा होता.
दोन वर्षांच्या कार्टर डलासचा विक्रम; एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचणारा सर्वात लहान मुलगा

काठमांडू : कार्टर डलास, वय वर्षे २. या चिमुरड्याने माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पाऊल ठेवून जागतिक विक्रम केला आहे. यापूर्वी माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पाऊल ठेवणारा मुलगा चार वर्षांचा होता.

कार्टरने माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर जाण्याचा प्रवास वडील रॉस व आई जेड यांच्या पाठीवरून केला. स्कॉटलंडला राहणारे रोस व जेड हे आपल्या मुलासह एका वर्षाच्या आशियाच्या प्रवासाला निघाले आहेत. यासाठी त्यांनी आपले घर भाड्याने दिले आहेत. गेल्यावर्षी २५ ऑक्टोबरला माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर चढाईला सुरुवात केली. त्यानंतर ते तेथे पोहोचले. याबाबत रॉस म्हणाले की, आमच्यापेक्षा कार्टर हा अधिक उत्साहित होता. मला व झेडला उंचावर जाताना श्वास घेताना त्रास होत होता. मात्र कार्टरला काहीच अडचण झाली नाही. बेस कॅम्पवर चढाईपूर्वी दोन डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यांची आमची रक्तचाचणी केली. आमच्या तुलनेत कार्टर हा अधिक सुदृढ होते. आम्ही ट्रॅकिंगसाठी अन्नाची पाकिटे व दोन स्लीपिंग बॅग खरेदी केल्या. काठमांडू पोहचल्यानंतर २४ तासांत आम्ही चढाईला सुरुवात केली. आम्ही दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न सुरू केला. घरात आम्ही बर्फाच्या पाण्याने आंघोळ करत होतो. आम्ही कार्टरलाही त्याच पाण्याने आंघोळ घालत होतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in