
पुणे : देशातील विद्यापीठांमध्ये आता वर्षातून दोनदा प्रवेश होतील. विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अधिसूचनेनुसार आता इग्नूसारखे कोणतेही विद्यापीठ जुलै-ऑगस्ट आणि जानेवारी-फेब्रुवारीमध्ये वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया सुरू करू शकते. विद्यापीठ त्यांच्या पायाभूत सुविधा, प्राध्यापक आणि समर्थन प्रणालीनुसार वर्षातून दोनदा प्रवेश घेऊ शकतात आणि त्यासाठी नियम लागू करू शकतात, असे यूजीसीने अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.
यूजीसीच्या अधिसूचनेनुसार, विद्यार्थी आता कमी वेळेत त्यांची पदवी पूर्ण करू शकतात आणि विस्तारित पदवी कार्यक्रम देखील घेऊ शकतात. या निर्णयामुळे त्वरित किंवा विस्तारित पदवी कार्यक्रमाद्वारे पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा नियम लागू झाला आहे.
आता विद्यार्थ्यांसमोर तीन पर्याय असतील. पहिला पर्याय म्हणजे ठरावीक कालावधीत पदवी मिळवणे. दुसरा पर्याय म्हणजे निर्धारित कालावधीपेक्षा जास्त वेळात पदवी मिळवणे हा आहे. विद्यार्थी पहिले किंवा दुसरे सत्र पूर्ण केल्यानंतर डिग्री प्रोग्राम निवडून पदवी पूर्ण करण्यासाठी पेडिटस- मिळवू शकतील.
कमी वेळेत पदवीसाठी १० टक्के अर्ज स्वीकारणार
प्राप्त झालेल्या अर्जांपैकी १० टक्के अर्ज कमी वेळेत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी निवडले जातील. विस्तारित पदवी कार्यक्रमांतर्गत, विद्यार्थी अधिक वेळेत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. ते दोन सेमिस्टरपर्यंत वाढवू शकतात. तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम चार वर्षांपर्यंत वाढवता येतो आणि चार वर्षांचा अभ्यासक्रम पाच वर्षांपर्यंत वाढवता येतो. जेव्हा तुम्हाला पदवी मिळेल, तेव्हा त्यावर विद्यार्थ्याने पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी किती वेळ घेतला, हे लिहिलेले असेल असे देखील स्पष्ट केले आहे.