‘उज्ज्वला’मध्ये आता ४ अनुदानित सिलिंडर

केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या संख्येत मोठी कपात केली आहे.
‘उज्ज्वला’मध्ये आता ४ अनुदानित सिलिंडर
‘उज्ज्वला’मध्ये आता ४ अनुदानित सिलिंडर
Published on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या संख्येत मोठी कपात केली आहे. आता लाभार्थ्यांना वर्षाला केवळ ४ अनुदानित सिलिंडर मिळणार आहेत.

मे २०१६ मध्ये उज्ज्वला योजना सुरू झाली तेव्हा लाभार्थ्यांना वर्षाला १२ सिलिंडरवर अनुदान मिळत होते. गेल्या वर्षी हे प्रमाण ९ सिलिंडरवर आणले होते, आता ते ४ सिलिंडरपर्यंत कमी करण्यात आले आहे.

या योजनेतील लाभार्थ्यांना १४.२ किलोच्या प्रति सिलिंडरवर ३०० रुपयांचे थेट अनुदान बँक खात्यात जमा केले जाते. दिल्लीमध्ये १४.२ किलोच्या सिलिंडरची किरकोळ किंमत आता ९४२ रुपयांवर पोहोचली आहे.

३०० रुपयांच्या अनुदानानंतर लाभार्थ्यांना हा सिलिंडर ६४२ रुपयांना पडतो. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि हार्मोनुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमती ४६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे सिलिंडरचा पुरवठा खर्च १६०० रुपयांच्या वर गेला आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.

logo
marathi.freepressjournal.in