दक्षिण आफ्रिकी खेळाडू झाले उकाड्याने हैराण

दक्षिण आफ्रिकी खेळाडू झाले उकाड्याने हैराण
Published on

पाहुण्या दक्षिण आफ्रिकी खेळाडूंना राजधानीतील उष्णतेशी जुळवून घेताना कसरत करावी लागत असून ते उकाड्याने बेजार झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेझ शम्सीने एक मिश्कील ट्विट करून दिल्लीतील उपरोधाने हवामानाचे अपडेट्स दिले आहेत. तबरेझ शम्सीला दिल्लीच्या हवेतील उष्णता त्रासदायक वाटू लागली आहे. याबद्दल त्याने “बाहेर फक्त ४२ अंश तापमान आहे. अजिबात उष्णता नाही,” असे उपहासात्मक ट्विट केले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ जूनपासून पाच टी-२० सामन्यांची मालिका सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. दिल्लीतील वातावरणामध्ये प्रचंड उष्णता आहे. अगदी रात्रीचे तापमानही ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूंना अस्वस्थ वाटत असल्याचे सांगण्यात येते. कर्णधार टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकी संघाने जोरदार सरावाला सुरुवात केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in