युपीचा कुख्यात डॉन अतीकच्या मुलाचा एन्काउंटर; युपी पोलिसांची मोठी कामगिरी

उत्तर प्रदेशमधील कुख्यात डॉन अतीक अहमदच्या मुलासोबत आणखी एका शूटरचा एन्काउंटर केल्याची माहिती देण्यात आली
युपीचा कुख्यात डॉन अतीकच्या मुलाचा एन्काउंटर; युपी पोलिसांची मोठी कामगिरी

कुख्यात डॉन अतीक अहमदचा मुलगा असद आणि आणखी एका शूटरचा उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने झाशीमध्ये एन्काउंटर केला आहे. उमेश पाल हत्या प्रकरणात असद हा मुख्य आरोपी होता. तर, त्याच्यासोबत गुलाम नावाचा सहआरोपीदेखील या एन्काउंटरमध्ये मारला गेला आहे. या दोघांकडून परदेशी बनावटीची शस्त्र हस्तगत करण्यात आली आहेत.

उत्तर प्रदेश पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देण्यात सांगितले की, "अतिक अहमदचा मुलगा असद आणि मकसूदचा मुलगा गुलाम हे दोघेही उमेश पाल हत्याकांड प्रकरणात आरोपी होते. झाशीचे पोलिस उपअधीक्षक नवेंदु आणि पोलिस उपअधीक्षक विमल यांच्या नेतृत्वामध्ये उत्तर प्रदेशच्या एसटीएफसोबत झालेल्या चकमकीत त्यांचा खात्मा करण्यात आला. एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना हत्यारे टाकून आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते, पण दोघांनीही पोलिसांवर गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या चकमकीत दोघेही ठार झाले असून त्यांच्यावर ५ - ५ लाखांचे बक्षीस होते." पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे देशभरातून कौतुक होत आहे.

या एन्काउंटरबद्दल बोलताना उमेश पाल यांच्या आई शांती देवी म्हणाल्या की, "ही माझ्या मुलाला श्रद्धांजली आहे. आम्हाला न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानते. यापुढेही आम्हाला असाच न्याय द्यावा. आमचा मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in