कोलकाता येथील छाप्यात २५० कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त

कोलकाता स्थित कंपनी वीज पारेषण आणि वीज वितरण उपकरणे तयार करण्याचे काम करते.
कोलकाता येथील छाप्यात २५० कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त

आयकर विभागाने कोलकाता येथील एका कंपनीच्या आवारात छापे टाकून २५० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली आहे.

सीबीडीटीने गुरुवारी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, कोलकाता स्थित कंपनी वीज पारेषण आणि वीज वितरण उपकरणे तयार करण्याचे काम करते. २४ आणि २८ ऑगस्ट रोजी या कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आल्याचे सीबीडीटीकडून सांगण्यात आले.

पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये असलेली ही कंपनी स्टील पाईप्स आणि पॉलिमरच्या निर्मितीमध्ये व्यवहार करते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in