नवी दिल्ली : बँकांमध्ये पडून असलेली विनादावा रक्कम वाढत आहे. मार्च २०२३ पर्यंत देशातील बँकांमध्ये विनादावा रक्कम ४२,२७० कोटींवर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली.
मार्च २०२२ मध्ये सरकारी व खासगी बँकांमध्ये विनादावा रक्कम ३२,९३४ कोटी होती. मार्च २०२३ पर्यंत हीच रक्कम ४२,२७२ कोटी रुपयांपर्यंत गेली. सरकारी बँकांमध्ये ३६,१८५ कोटी, तर
१० वर्षांपेक्षा अधिक काळ ही रक्कम बँक खात्यात पडून राहिल्यास ती आरबीआयच्या ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधीत जमा होते. विनादावा रकमेचे प्रमाण कमी होण्यासाठी आरबीआयने अनेक पावले उचलली आहेत. आरबीआयच्या निर्देशानुसार, बँकांनी विनादावा रकमेची यादी बँकेत लावली आहे. तसेच ती वेबसाइटवर टाकली आहे. तसेच ज्या खातेदारांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कायदेशीर वारसांचा शोध घेतला जात आहे. आरबीआयने ‘१०० डेज १०० पेज’ ही मोहीमही सुरू केली. यात १०० दिवसांत प्रत्येक बँकेने किमान १०० विनादावा रक्कम द्यावी, अशी योजना आखली. या योजनेत आतापर्यंत १४३२.६८ कोटींची रक्कम परत केली आहे.