Union Budget 2023 : संसदीय अधिवेशनाला सुरुवात; पंतप्रधान म्हणाले, 'भारत प्रथम, नागरिक प्रथम'

आजपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन (Union Budget 2023) सुरू होणार असून पंतप्रधान म्हणाले की, ‘भारत प्रथम, नागरिक प्रथम’ हा विचार घेऊन अधिवेशन पुढे घेऊन जाणार
Union Budget 2023 : संसदीय अधिवेशनाला सुरुवात; पंतप्रधान म्हणाले, 'भारत प्रथम, नागरिक प्रथम'
@ANI

आजपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन (Union Budget 2023) सुरू झाले आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधला.

तर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती (President of India) द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणाने झाली. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले की, " ‘भारत प्रथम, नागरिक प्रथम’ हा विचार घेऊन आम्ही संसदेचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढे घेऊन जाणार आहोत. मला विश्वास आहे की विरोधी पक्षाचे नेते संसदेसमोर आपली मते मांडतील." असा विश्वास त्यांनी दर्शवला.

पुढे ते म्हणाले की, "आज भारत देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संदेश पोहचला आहे. तसेच, संपूर्ण जगाचे लक्ष आपल्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे."

पुढे ते म्हणाले की, "आज देशात नारीशक्तीचा सन्मान करण्याची संधी आपल्याकडे आहे. विशेष म्हणजे आपल्या राष्ट्रपती आणि अर्थमंत्री या दोन्हीही महिला आहेत, याचा अभिमान वाटतो. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in