हिंदुस्थान झिंकमधील पूर्ण हिस्सा विकण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी

हिंदुस्थान झिंकमधील पूर्ण हिस्सा विकण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी
Published on

हिंदुस्थान झिंकमधील आपला पूर्ण हिस्सा विकण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सध्या या कंपनीत केंद्राची २९.५४ टक्के हिस्सेदारी आहे. याचे मूल्यांकन सध्या ३९३८५.६६ कोटी आहे.

या निर्णयानंतर हिंदुस्थान झिंकचा समभाग ४.१० टक्क्याने वाढून ३०७.५० रुपयांवर बंद झाला. सरकारने २००२ मध्ये हिंदुस्थान झिंकमधील २६ टक्के भागीदारी स्टरलाईट ऑपर्चुनिटीज वेंचर्स लिमिटेडला ७४९ कोटी रुपयांना विकली होती. त्यानंतर या कंपनीने भागीदारी ६४.९२ टक्के केली. यासाठी कंपनीला केवळ १५०० कोटी रुपये खर्च करावे लागले. मात्र, तिचे बाजारमूल्य १ लाख कोटी रुपये होते.

मोदी सरकारने २०२२-२३ या आर्थिक वर्षात ६५ हजार कोटी रुपयांची निर्गुंतवणूक करण्याचे लक्ष ठेवले आहे. आयटीसीत सरकारचा ७.९१ टक्के हिस्सा आहे. पवनहंस, एससीआय, आयडीबीआय बँक, बीपीसीएलच्या विक्रीला विलंब होत आहे. त्यामुळे सरकार अन्य पर्यायांचा विचार करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in