केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची तब्येत बिघडली ; दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यानंतर...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची तब्येत बिघडली ; दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल

केंद्रीय अर्थमंत्री (Minister of Finance of India) निर्मला सीतारामन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीतारामन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. सीतारामन यांना सोमवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात (AIIMs) दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दुपारी बाराच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. निर्मला सीतारामन यांना खासगी वॉर्डात दाखल करण्यात आले आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in