शैक्षणिक धोरणात मातृभाषा सक्तीची करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

नवीन शैक्षणिक धोरणात आम्ही मातृभाषा अनिवार्य करणार आहोत. आमच्या या निर्णयाला प्रचंड विरोध होणार आहे, याची आम्हाला कल्पना आहे.
शैक्षणिक धोरणात मातृभाषा सक्तीची करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन
Published on

मुंबई : नवीन शैक्षणिक धोरणात आम्ही मातृभाषा अनिवार्य करणार आहोत. आमच्या या निर्णयाला प्रचंड विरोध होणार आहे, याची आम्हाला कल्पना आहे. तरीही आम्ही हा निर्णय घेणार आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, बॉम्बे नको मुंबई नाव हवे, अशी मागणी मी केली होती. माझे सांगणे आहे की, किमान तुमच्या घरात तरी मातृभाषेत बोला. जर तुम्ही हे केले नाही, तर आपल्याला मोठ्या संख्येने वृद्धाश्रम काढण्याची वेळ येईल. कारण जर घरात नातू मातृभाषेत बोलला नाही तर त्याचे आजोबाशी नाते कसे जुळणार? सध्या घरात आई-वडिलांना वेळ नसतो, तो केवळ आजी-आजोबांना असतो. त्यामुळे मातृभाषा येणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

प्रत्येक क्षेत्रात कोणत्याही प्रकारची मागणी न करता केवळ काम करणारा समाज म्हणजे पारसी आहे. या समाजाने मागण्या न करता समाजाची सेवा केल्याचे पाहायला मिळते. मग ते टाटा असोत की होमी भाभा. या समाजाने मोठे योगदान दिले आहे. अल्पसंख्यांक समाजासाठी धडपडणाऱ्या लोकांना मला सांगायचे आहे, अल्पसंख्यांक समाजातही अल्पसंख्यांक समाज आहे, तो म्हणजे पारसी समाज, असे शहा यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in