केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कारला अपघात

या अपघातातून सुदैवाने रामदास आठवले बचावले आहेत. मात्र, त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कारला अपघात
Published on

कराड : साताऱ्याजवळ वाई येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कारने कंटेनरला गुरुवारी धडक दिली आहे. या अपघातातून सुदैवाने आठवले बचावले आहेत. मात्र, त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.

आठवले म्हणाले की, वाईमधून मुंबईला निघालो तेव्हा सव्वासहा वाजता खंडाळा बोगद्यात एका गाडीचा पंक्चर काढत होते. त्यावेळी दोन कंटेनर तिथे थांबले होते. तेव्हा आमच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी कंटेनरवर आदळली. आमच्या ड्रायव्हरने ब्रेक दाबल्याने आमचीही गाडी ठोकली. यात आमच्या गाडीच्या इंजिनाचे नुकसान झाले. माझ्याबरोबर माझी पत्नी सीमा आणि तिची आई होती. मात्र, आम्ही सगळे सुखरूप आहोत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in