केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या ताफ्याला अपघात ;एकाचा मृत्यू, तीन जखमी

सिंगोडी बायपास येथे समोरून चुकीच्या मार्गिकेतून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एकाचा मृत्यू झाला.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या ताफ्याला अपघात
;एकाचा मृत्यू, तीन जखमी

भोपाळ : मध्य प्रदेशातील छिंदवाडाहून नरसिंगपुरा येथे झालेल्या अपघातातून केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा येथे दुचाकीस्वाराला वाचवताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मध्य प्रदेशमध्ये येत्या १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्यामुळे सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना भाजपने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. नरसिंगपूरमधून ते निवडणूक लढवत आहेत असून रात्रंदिवस प्रचारात व्यग्र आहेत. छिंदवाडा येथून पदयात्रा केल्यानंतर पटेल यांचा ताफा नरसिंगपूरच्या दिशेने निघाला होता. यादरम्यान सिंगोडी बायपास येथे समोरून चुकीच्या मार्गिकेतून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एकाचा मृत्यू झाला.

प्रल्हाद पटेल यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र पेशाने शिक्षक असलेल्या ३५ वर्षीय निरंजन चंद्रवंशी यांचा या अपघातात मृत्यू झाला. शाळा सुटल्यानंतर सोबत तीन मुलांना घेऊन तो घरी जात होता. जखमींना नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे, असे छिंदवाडाचे एसडीएम सुधीर जैन यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in