बदनामी केल्याप्रकरणी चंद्रशेखर यांची शशी थरूर यांना नोटीस

लोकसभा निवडणुकीत तिरुअनंतपूरम मतदारसंघात चंद्रशेखर आणि थरूर यांच्यात सरळ लढत होणार आहे. महत्त्वाच्या मतदारांना आणि प्रभावी व्यक्तींना चंद्रशेखर यांनी लाच दिली असल्याची सपशेल खोटी माहिती थरूर यांनी दिल्याचा आरोप चंद्रशेखर यांनी केला आहे.
बदनामी केल्याप्रकरणी चंद्रशेखर यांची शशी थरूर यांना नोटीस

तिरुअनंतपूरम : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. दूरचित्रवाणीवरील एका कार्यक्रमात थरूर यांनी आपली बदनामी केल्याचा आरोप चंद्रशेखर यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत तिरुअनंतपूरम मतदारसंघात चंद्रशेखर आणि थरूर यांच्यात सरळ लढत होणार आहे. महत्त्वाच्या मतदारांना आणि प्रभावी व्यक्तींना चंद्रशेखर यांनी लाच दिली असल्याची सपशेल खोटी माहिती थरूर यांनी दिल्याचा आरोप चंद्रशेखर यांनी केला आहे.

चंद्रशेखर यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी थरूर यांनी जाणीवपूर्वक हे वक्तव्य केले आहे, इतकेच नव्हे तर थरूर यांच्या वक्तव्यामुळे तिरुअनंतपूरममधील संपूर्ण ख्रिश्चन समाजाबद्दल, नेत्यांबद्दल अनादर व्यक्त झाला आहे. कारण थरूर यांचे वक्तव्य ‘कॅश फॉर व्होट’सदृश आहे, असा आरोप चंद्रशेखर यांनी केला आहे. त्याचप्रमाणे थरूर यांचे वक्तव्य आचारसंहितेचा भंग करणारे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in