केंद्रीय मंत्री स्मृती इराणी मुलीमुळे अडचणीत ; काँग्रेसला काेर्टात खेचणार

जोइश इराणी हिच्यावर गोव्यातील ‘सिली सोल्स कॅफे अॅण्ड बार’ नामक रेस्टॉरंट चालवण्याचा आरोप केला
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी मुलीमुळे अडचणीत ; काँग्रेसला काेर्टात खेचणार

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी गोव्यात अवैध परवान्यासह बार चालवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. इराणींनी काँग्रेसचा हा आरोप फेटाळून लावला असून त्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे. “काँग्रेसचे आरोप निराधार आहेत. माझी १८ वर्षांची मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी असून ती बार चालवत नाही. काँग्रेसने माझ्या मुलीचे चारित्र्यहनन व माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी हे आरोप केलेत,” अशी टीका स्मृती इराणी यांनी केली.

काँग्रेसने स्मृती इराणींची कन्या जोइश इराणी हिच्यावर गोव्यातील ‘सिली सोल्स कॅफे अॅण्ड बार’ नामक रेस्टॉरंट चालवण्याचा आरोप केला आहे. या बारचा परवाना अधिकृत असून, अद्याप या परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले नाही. बारमालकाचा १३ महिन्यांपूर्वीच मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. “या प्रकरणी मी कोर्टात जाब विचारणार आहे. राहुल गांधींचा अमेठीत पराभव करणे, हा माझा एकमेव अपराध आहे. काँग्रेस प्रवक्त्यांनी माझ्या मुलीला अवमानित केले. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी पेपर दाखवून माझी मुलगी बार चालवत असल्याचा आरोप केला. हे सर्वकाही काँग्रेस नेतृत्वाच्या इशाऱ्यानुसार होत आहे,” अशा शब्दांत स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर पलटवार केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in