केंद्रीय मंत्र्यांच्या शेतकरी नेत्यांसोबत वाटाघाटी सुरूच; हरयाणामधील इंटरनेट बंद,नोएडात संचारबंदी

पंजाबमधील शेतकऱ्यांनी मंगळवारी राष्ट्रीय राजधानीकडे कूच सुरू केली, परंतु हरयाणासह शंभू आणि खनौरी सीमेवर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले.
केंद्रीय मंत्र्यांच्या शेतकरी नेत्यांसोबत वाटाघाटी सुरूच; हरयाणामधील इंटरनेट बंद,नोएडात संचारबंदी

चंदिगड : पंजाब-हरयाणा सीमेवरील दोन ठिकाणी आंदोलक आणि सुरक्षा जवानांमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तीन केंद्रीय मंत्र्यांनी गुरुवारी संध्याकाळी चंदिगडमध्ये शेतकरी नेत्यांशी चर्चेची तिसरी फेरी सुरू केली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही या बैठकीत सामील झाले. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देणाऱ्या कायद्यासह शेतकरी संघटनांच्या मागण्यांबाबत बैठकीत केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करत आहेत. सेक्टर २६ मधील महात्मा गांधी स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन येथे ही बैठक होत आहे. दरम्यान, हरयाणामध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली असून नोएडात संचारबंदी लागू केली आहे.

दोन्ही बाजूंमधील चर्चेची ही तिसरी फेरी असेल. ८ आणि १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या चर्चेच्या मागील दोन फेऱ्या अनिर्णित राहिल्या. बैठकीत सहभागी होणाऱ्या शेतकरी नेत्यांमध्ये एसकेएम (गैर-राजकीय) नेते जगजित सिंग डल्लेवाल आणि किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सर्वन सिंग पंधेर यांचा समावेश आहे. संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाने आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी केंद्रावर दबाव आणण्यासाठी 'दिल्ली चलो'ची हाक दिली आहे.

पंजाबमधील शेतकऱ्यांनी मंगळवारी राष्ट्रीय राजधानीकडे कूच सुरू केली, परंतु हरयाणासह शंभू आणि खनौरी सीमेवर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले. केंद्राच्या प्रस्तावांच्या आधारे पुढील कृती धोरण ठरण्यात येणार आहे, असे आश्वासन देण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in