भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेची सुरुवात झाली असून प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मातीचे परिक्षण सुरु केलं आहे. इस्त्रोने रविवारी ट्वीट करत याची माहिती दिली. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार अंतराळा विज्ञानाच्या इतिसाहात पहिल्यांदा चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रूवावरील मातीचे परिक्षण केले. चंद्राच्या पृष्ठभागाखाली १० सेमी पर्यंत तापमानात फरक होता, अशी माहिती इस्रोने शेअर केली आहे.
इस्रोनो दिलेल्या माहितीनुसार चंद्राच्या दक्षण ध्रूवावर मातीचे तापमान प्रोफाइलिंग करणयाची ही पहिलीच वेळ आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर पहिल्यांदाच एखाद्या देसाने सॉफ्ट लँडिंग केले आहे. इस्त्रोने मातीच्या तापमानाचा आलेख देखील शेअरकेला आहे. यात तापमान उणे १० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्याचं दिसून येत आहे. रतीय अंतराळ संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ChaSTE पेलोड चंद्राच्या पृष्ठभागाचे थर्मल समजून घेण्यासाठी ध्रुवाभोवती चंद्राच्या वरच्या मातीच्या तापमान प्रोफाइलचे मोजमाप करते. यात तापमान तापासले जाते.
भारताचे मून लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले ठिकाण 'शिवशक्ती' म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या कार्यालयाचा भेट दिली. त्यावेळी त्यांनी शास्त्रांशी संवाद साधला. यावेळी दरवर्षी २३ ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस'म्हणून राजरा केला जाईल अशी देखील घोषणा त्यांनी केली.