जयाप्रदा 'फरार' घोषित, अटक करून ६ मार्चला हजर करा; न्यायालयाचे आदेश

उत्तर प्रदेशातील रामपूर येथील न्यायालयाने मंगळवारी जयाप्रदा यांना ‘फरार’ म्हणून घोषित केले. तसेच पोलिसांनी त्यांना अटक करून ६ मार्चला न्यायालयासमोर हजर करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
जयाप्रदा 'फरार' घोषित, अटक करून ६ मार्चला हजर करा; न्यायालयाचे आदेश

रामपूर : माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांना निवडणूक आचारसंहिता उल्लंघनाच्या दोन प्रकरणांमध्ये उत्तर प्रदेशातील रामपूर येथील न्यायालयाने मंगळवारी ‘फरार’ म्हणून घोषित केले. तसेच पोलिसांनी त्यांना अटक करून ६ मार्चला न्यायालयासमोर हजर करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

वरिष्ठ अभियोग अधिकारी अमरनाथ तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपूरच्या माजी खासदार जयाप्रदांविरोधात केमारी आणि स्वार पोलीस ठाण्यात २०१९ लोकसभा निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणांमध्ये विशेष खासदार-आमदार न्यायालयाने अनेकवेळा समन्स बजावले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in