Video | अलिगडमध्ये समाजकंटकांकडून दंगल भडकवण्याचा प्रयत्न; मशिदीवर लिहिल्या ‘जय श्री राम’च्या घोषणा

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भिंतीवर लिहिलेल्या ‘जय श्री राम’च्या घोषणा पुसल्या आहेत. तसेच परिसरातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडीयावर व्हायरल झाली आहे.
Video | अलिगडमध्ये समाजकंटकांकडून दंगल भडकवण्याचा प्रयत्न; मशिदीवर लिहिल्या ‘जय श्री राम’च्या घोषणा

उत्तर प्रदेशातील  अलिगड येथील मशिदीच्या भिंतीची तोडफोड करुन त्यावर धार्मिक घोषणा लिहिल्याचा प्रकार समोर आला आहे. अलीगडमधील दिल्ली गेट चौकातील मशिदीबाबात शनिवारी ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भिंतीवर लिहिलेल्या ‘जय श्री राम’च्या घोषणा पुसल्या आहेत. तसेच परिसरातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडीयावर व्हायरल झाली आहे.

 या घटनेनंतर समाजवादी पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक मृगांक शेखर पाठक यांची भेट घेऊन याबाबत तक्रार दाखल करत समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी सपा नेते मनोज यादव यांनी अशा कारवायांद्वारे काही समजाकंटक शहरातील वातावरण घराब करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणी दोषी असेल्यांवर कडक कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले असून गटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. व्हिडिओ फुटेजवरुन संबंधित व्यक्तींची ओळख पटली असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक पाठक यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in