UP : व्यावसायिकाने 5 स्टार हॉटेलच्या छतावरून तरुणाला फेकल्याची घटना CCTV मध्ये कैद

एका व्यापारी पिता-पुत्राने पीडितला मारहाण केल्यानंतर हॉटलेच्या छतावरून फेकण्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
 UP : व्यावसायिकाने 5 स्टार हॉटेलच्या छतावरून तरुणाला फेकल्याची घटना CCTV मध्ये कैद

लखनऊ : प्री-वेडिंग पार्टीत दारूच्या नशेत भांडण झाल्यानंतर एका व्यावसायिकाच्या मुलाला पंचतारांकित हॉटेलच्या छतावरून फेकण्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये घडली आहे. एका व्यापारी पिता-पुत्राने पीडितला मारहाण केल्यानंतर हॉटलेच्या छतावरून फेकण्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पीडित तरुणाचे नाव सार्थक अग्रवाल आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पीडित तरुणाची अवस्था गंभीर असून त्याला बरेलीच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या पीडित तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटना इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पिता-पुत्राविरोधात एफआयआर दाखल केली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी आरोपींवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सतीश अरोरा आणि त्यांचा मुलगा रिदम यांनी सार्थक अग्रवालला मारहाण करून धक्काबुक्की करून त्याला हॉटेलच्या छतावरून खाली फेकून दिल्याचा आरोप आहे. या सीसीटीव्ही फुटेज 2 मिनिटे आणि काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये काही लोक एका तरुणाला छतावरून खाली फेकत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. २१ एप्रिलच्या रात्री हॉटेलमध्ये वाद आणि हाणामारीची घटना घडली होती.

logo
marathi.freepressjournal.in