दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

वीटभट्टीचा ठेकेदार रामरूप निषाद (४८), त्याचा मुलगा राजू (१८) आणि पुतण्या संजय (१९) यांनी या अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला असल्याचा आरोप
दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

कानपूर : उत्तर प्रदेशात घटमपूर भागातील एका गावात वीटभट्टीजवळच्या शेतातील झाडावर दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले असून त्यांच्यावर बलात्कार केला गेला असल्याचा दावा करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या संबंधात तिघांना अटक करण्यात आली आहे.

वीटभट्टीचा ठेकेदार रामरूप निषाद (४८), त्याचा मुलगा राजू (१८) आणि पुतण्या संजय (१९) यांनी या अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला असल्याचा आरोप मुलींच्या कुटुंबीयांनी केला आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक (कायदा व सुव्यवस्था) हरिश चंद्रा यांनी दिली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी या कृत्याचा व्हिडीओ देखील बनवला होता. त्यामुळे बुधवारी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे चंद्रा यांनी सांगितले. या मुली बुधवारी बेपत्ता झाल्यानंतर संध्याकाळी, त्यांचे मृतदेह वीटभट्टीपासून ४०० मीटर अंतरावर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले, असे चंद्रा यांनी सांगितले. मृत अल्पवयीन मुली १४ आणि १६ वर्षांच्या असल्याचे समजते.

logo
marathi.freepressjournal.in