गुळाचे शेण करण्यात यूपीएचे कौशल्य -निर्मला सीतारामन

यूपीएच्या काळातील १० वर्षांच्या कामगिरीची श्वेतपत्रिका शनिवारी राज्यसभेत मांडली गेली.
Budget 2024 साठी निर्मला सीतारामन यांनी नेसली 'टसर सिल्क' साडी, किंमत किती?
Budget 2024 साठी निर्मला सीतारामन यांनी नेसली 'टसर सिल्क' साडी, किंमत किती?

नवी दिल्ली : गुळाचे शेण करण्यात यूपीए माहीर होती, अशी जळजळीत टीका अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत केली. यूपीएच्या काळातील १० वर्षांच्या कामगिरीची श्वेतपत्रिका शनिवारी राज्यसभेत मांडली गेली.

त्यावेळी अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, यूपीएच्या काळात झालेले गैरव्यवस्थापन मांडण्यासाठीच हे करायचे आहे. आमच्या सरकारने अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने चालवायला लावली, तर येत्या काळात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेली जाईल, असे त्या म्हणाल्या. मोदी सरकारने ईशान्य भारताकडे विशेष लक्ष दिले. यापूर्वीच्या सरकारनी ईशान्य भारताकडे दुर्लक्ष केले होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे आसामचे खासदार होते. मात्र त्यांनी काय केले, असा प्रश्न त्यांनी केला.

विरोधी पक्ष आमच्यासमोर महागाई वाढल्याची टीका करतात. पण, मी सांगू इच्छिते की, अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या शेवटच्या वर्षात महागाईचा दर ४ टक्क्यांपेक्षा कमी होता. तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी तुमच्याकडे चार टक्क्यांपेक्षा कमी असलेली महागाई असलेली अर्थव्यवस्था सोपवली होती. पण, काँग्रेसने त्याचे काय केले हे सर्वांनी पाहिले. वित्तीय तूट, अनुदानाची पद्धत विपरीत होती. राजकीय लाभासाठी देशाच्या खजिन्याची लूट करण्यात आली, अशी टीका त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in